Romance Is In The Air..!! Presenting New Romantic Marathi Songs 2018 "Shona" from Marathi Movie "Boyz 2 बॉईज २". Beautifully Sung by Rohit Raut & Juilee Joglekar. Music composed by Avadhoot Gupte & Lyrics penned by Mandar Cholkar.

Song Credits:

Singers - Rohit Raut, Juilee Joglekar
Lyrics Written by Mandar Cholkar
Music Directed by Avadhoot Gupte
Recording - Geet Studio

Song Lyrics:

नकळत हे झाले असे अन्
मन जुळले माझे तुझे
दरवळतो प्रेमाचा मौसम
जग अवघे माझे तुझे

अनोळखी वाटेवरी
भान हरवले जरी
शहारल्या क्षणातही
तोल सावरताना

सारे ... हरवून ये ना
सारे विसरू... ये ना
गाणे... गुणगुणताना
रिमझिम बरसत... ये ना


अंतरा १

अबोल स्वप्नांचे
तरंग उठताना
ये बोलुया... डोळ्यातुनी

तुझ्य इशांऱ्याने
उनाड वारा ही
खुणावतो... भासांतुनी

जिथे जिथे ... फिरे नजर
तुझा असर...तुझा बहर

सारे ... हरवून ये ना
सारे विसरू... ये ना
गाणे... गुणगुणताना
रिमझिम बरसत... ये ना

अंतरा २

मनातले सारे
ओठांवरी आले
हुरहूर ही लागे नवी

सुगंध श्वासांचा
श्वासांत भरताना
मिठी जणू उमलावी

तुझ्यात मी.. माझ्यात तू
पुकारतो नवा ऋतू

सारे ... हरवून ये ना
सारे विसरू... ये ना
गाणे... गुणगुणताना
रिमझिम बरसत... ये ना